Help - Search - Members - Calendar
Full Version: Tya Kovalya Phulancha - Shridhar Phadake
Hamara Forums > Music > Regional Music > Marathi
yogihit
must listen once in life...

Tya Kovalya Phulancha
Album - Phite Andharache Jale
Year - 1979
Singer - Shridhar Phadke
Duration - 5.05 mins
Bitrate - 128kbps
Format - mp3
yogihit
त्या कोवळ्या फुलांचा..' झाला तीस वर्षांचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 12:15 AM (IST)


विद्याधर कुलकर्णी
पुणे - देहविक्रय करून पोटाची खळगी भरणाऱ्या महिलांनाही मन असते, भावना असतात. त्यांनाही माणूस म्हणून काही तरी वाटत असते हे वास्तव सांगणाऱ्या अनिल कांबळे यांच्या "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' या गजलेच्या जन्माला नुकतीच तीस वर्षे झाली. या कालावधीत गीताच्या रूपाने ही वेदना मराठी घराघरांमध्ये पोचली असली तरीही या महिलांच्या परिस्थितीमध्ये मात्र फारसा फरक पडलेला नाही.

पुण्यातील बुधवार पेठेतील ठराविक भाग हा काहीसा बदनाम भाग. सध्याच्या भाषेत "रेड लाइट एरिया' ही त्याची ओळख. प्रामुख्याने कष्टकऱ्यांची वसाहत असलेल्या शहराच्या या जुन्या भागामध्ये अनिल कांबळे या संवेदनशील कवीने आपले बालपण घालविले. आसपासचे हे वातावरण आणि या महिलांच्या मुलांची लाभलेली संगत यामुळे या महिलांची वेदना त्यांच्या मनामध्ये घर करून राहिली. कवितेचा छंद लागल्यावर या वेदनेला शब्दरूप मिळाले. प्रसिद्ध बासरीवादक अजित सोमण यांनी या कविता ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे पुत्र श्रीधर फडके यांच्याकडे पाठविल्या. या वेदनेला लाभलेल्या शब्दांना फडके यांनी सुरांची साथ दिली आणि त्याला बाबूजींनीही दाद दिली. आजही श्रीधर फडके यांना अनेक कार्यक्रमांमध्ये हे गीत ऐकविण्याची फर्माईश होते. इतकेच नव्हे तर त्याला "वन्स मोअर'देखील मिळतो.

या गीताच्या आठवणी सांगताना कांबळे म्हणाले, ""माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आमचे वास्तव्य बुधवार पेठ येथील ग्लोब टॉकीजसमोरच्या (सध्याचे श्रीनाथ चित्रपटगृह) गल्लीत आहे. हातावर पोट असलेल्या साध्या माणसांचे संस्कार माझ्यावर झाले. घरासमोरच या महिलांची वस्ती होती. त्या वेळी मला त्याचा अर्थ कळत नव्हता. या महिलांच्या मुलांशी मी खेळायचो. इतकेच काय, आमच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला त्या प्रसाद घेण्यासाठी आवर्जून यायच्या हेदेखील मला आठवते.''

""नदीकिनारी कातरवेळी
किती वेळ मी पाट पाहिली
हळूच येऊन नयन झाकशील
या आशेवर पहाट झाली'
ही माझी पहिली कविता त्या वेळी "सकाळ'च्या "साप्ताहिक स्वराज्य'मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर काव्यस्पर्धा आणि कविसंमेलनांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. "रंग माझा वेगळा' गजलसंग्रह हाती पडला आणि मी सुरेश भट यांच्या प्रेमात पडलो. आधी वेगळ्या पद्धतीने लिहिलेली कविता भटांनी मार्गदर्शन केल्यामुळे "त्या कोवळ्या फुलांचा...' ही रचना 1979 मध्ये गजल स्वरूपात आली. श्रीधर फडके यांनी दूरध्वनी करून "तुमची कविता मी स्वरबद्ध केली असून ध्वनिमुद्रित होत आहे,' असे कळविले. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे या गीताचा समावेश असलेल्या "स्वरवेल' या ध्वनिफितीचे प्रकाशन झाले. पुढे "टी सिरीज'ने भारतात ध्वनिफीत प्रकाशित केली. या गीताने मला ओळख आणि असंख्य रसिक दिले,'' असे त्यांनी सांगितले.

""अर्थात या वेदनेला दाद मिळाली असली तरीही या महिलांच्या स्थितीमध्ये, या वस्तीच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. वेदनेला दाद देणाऱ्या रसिकांनी या महिलांना समाजाच्या परिघाच्या बाहेर ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने केले आहेत. ती स्थिती बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने या "कोवळ्या फुलांना' बाजारातून बाहेर आणणे शक्‍य होईल,'' असेही ते म्हणाले.

"त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशांत भावनेचा व्यापार पाहिला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी
रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी'
(मूळ गजलेमध्ये असलेला शेर)
बाहेर सभ्यतेचे गातात गोडवे जे
वेश्‍यागृहात त्यांचा दरबार पाहिला मी
dadas
Yogi,
Thanks for sharing this nice article.
dadas
QUOTE(yogihit @ Nov 20 2009, 01:06 PM) *

त्या कोवळ्या फुलांचा..' झाला तीस वर्षांचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 12:15 AM (IST)




This is a "lo-fi" version of our main content. To view the full version with more information, formatting and images, please click here.
Invision Power Board © 2001-2024 Invision Power Services, Inc.