Visit our other dedicated websites
Asha Bhonsle Geeta Dutt Hamara Forums Hamara Photos Kishore Kumar Mohd Rafi Nice Songs Shreya Ghoshal
Hamara Forums

Welcome Guest ( Log In | Register )

4th Jan

, A burden for life !

 
 
Reply to this topicStart new topic
> 4th Jan, A burden for life !
kcp
post Jan 3 2012, 10:12 PM
Post #1


Dedicated Member
Group Icon

Group: Members
Posts: 1787
Joined: 21-October 03
From: Dubai
Member No.: 10https://www.facebook.com/note.php?saved&...150462435756482
4th January has arises somewhere on mother earth ! This is a tribute by Varsha Bhosle in a Marathi magazine, Chanderi, just after the death of Panchamda. Translation is done by me and please correct me if I am wrong or did not convey the feelings ( It is simply impossible to replicate the mellifluous style of Varsha-ji, a big fan that I am of her writings ). Just reading the article gives us so much insights into the man...so many thoughts to ponder upon !!
May his soul rest in peace !

तेच ते आदीम सप्त स्वर. शतकानू शतके चालत आलेले. तेच सात सूर गुंफून एक नाविन्यपूर्ण चाल बांधायची. चाल बांधताना, फक्त एका उत्तम दर्ज्याच्याच संगीतकाराच्या संवेदनाक्षम आणि नाजूक ह्रुदयतून वाहणारी खास सुरांची शैली स्वतःहून समोर उभी राहते. तिच्यावर त्याचा शिक्का असतोच. आपण तिला बघताच, ती आपल्या मालकाकडे बोट दाखवत इतरवते, "माझं नाव "स्टाईल". आणि मी फक्त यांचीच". मदन मोहनपाशी ती होती. नौशादकडे आहे. रोशन, सलील, सज्जाद, जयदेव, सर्वच जुन्या दिग्गजांनी तिला वश केलं आणि जपलं. पण साठाव्या दशकापासून मात्र अन्य संगीतकारांनीच तिचं हरण केलं, तिचं वस्त्रहरण सुरु झालं. संगीतकार कसले ते ? गिधाडंच ती. दुसर्यांच्या कल्पनेचे लचके तोडायचे, आणि बाजारात कमी भावात विकायचे. शंकर-जयकिशन या थोर जोडीचं निधन-कलेतून आणि जगातून - हे फक्त निधन नव्हे. तो होता खून. त्यांच्या त्या चुरलेल्या हृदयांचा. आज, ४ जानेवारी, १९९४ रोजी, माझ्या सावत्र-वडिलांचा, आर. डी. बर्मन यांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला. पहिले घाव घातले होते _____ ______ ने ( direct name of a music director was printed, but deleted by kcp, only to prevent any bad feelings reading this "tribute" )

मनातली सगळी कटुता मृत्यू पुसून टाकतो. कदाचित, एक दिवस मी ____ला ही ( same music director 's name ) क्षमा करेन. पण आज ते मला शक्य नाही. माझी जखम ओली आहे, वाहते आहे. किती विचित्र आहे. एखाद्या गोष्टीविशायाचा आकस वर्षानुवर्षे मनात धरून ठेवण्याच्या या स्वभावामुळेच पंचम अंकलशी मी त्यांच्या आयुष्यातली शेवटची तीन वर्षे बोलत नव्हते. शेवटी ते भांडण मीच मिटवलं. पण ते केवळ त्यांची बायको, माझी आई आशा भोसले, हिच्या आनंदासाठी. तिच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आईने आणि त्यांनी आपसातले मतभेद केव्हाच मिटवून टाकले होते. मीच आपला मोकळा किल्ला उगाच लढवत बसले. आता खूपच उशीर झाल्यानंतर उमगतंय. तो त्या दोघा नवरा-बायकोचा खासगी प्रश्न होता. त्यात नाक खुपसण्याचा मला अधिकार नव्हता. पडद्यावरचे प्रसंग जसे कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यात घडतात, तसेच "अभिमान" या सिनेमामाधले प्रश्न यांच्याही लग्नात आले असावेत. पण तरीही त्यात मध्ये पडण्याचा मला हक्क नव्हता. माझी प्रतिक्रिया ही एका "ओवर-पझेसिव्ह" आणि "ओवर-प्रोटेक्टव्ह" मुलीची होती. मी कधी आणि नेमकं कशासाठी त्यांच्याशी संबंध तोडले हेही मला आता आठवत नाही. ही रुखरुख मला आता आयुष्यभर बाळगावी लागणार.

पाच वर्षांची असताना मी सगळ्यांसमोर जाहीर केलं होतं "मी लग्न करेन, तर बाळ मामाशीच" . अर्थात, हे भूत माझ्या मानेवरून उतरलं. त्यानंतर सात-आठ वर्षांनी, "पती-पत्नी" मधलं "मार डालेगा दर्द जिगर", हे गाणं ऐकताच, मी गुपचूप ठरवलं की लग्न करेन तर याच संगीतकाराशी - आर. डी. बर्मनशी. आशा-आर. डी. रेकॉर्डिंग असेल तर वर्षा ही पाठी पाठी असायची. त्यांचं संगीत भान हरपून ऐकलं. पुढे मी थोडी अधिक "मच्योर" झाले. माझ्या समवयस्क मंडळीमध्ये गुंतले. पण त्या वयातलं पहिलं वेड कसं विसरणार ? आईला आणि पंचम अंकलना माझ्या या संगीत वेडाची पूर्ण जाणीव होती. या दोघांनी मला अतिशय हळुवारपणे आणि योग्य तो समतोल साधून हाताळलं. अगदी सुरात तारा जुळलेल्या वाद्याप्रमाणे ते माझ्याशी वागत. नव्हता कर्कश्शपणा, त्रास किंवा क्लेश. आपोआप थंड पडलेली माझ्यातली चुरस जागृत होऊ नये याची ते काळजी घेत. इतकं कि त्यानंतरचं त्याचं लग्न मनापासून स्वीकारणारी मी पहिली आणि कदाचित एकमेव व्यक्ती होते. त्या दोघांची गाठ स्वर्गात बांधलेली असावी. वापरून बोथट झालेलीच उपमा त्यांचं वर्णन अचूक करू शकते - ते होते ताल आणि ते सूर. मनांच्या आणि कलेच्या या अत्यंत खासगी बैठकीत इतरांना प्रवेश शक्य नव्हता. आज त्यांच्या अंतयात्रेच्या वेळी एक बाई म्हणाली, "मला वाटायचं ते वेगळे झालेत. आशताईना खरोखरच एवढं दुःख झालंय ?" मी ते ऐकलं. पण उत्तर देण्याचा नैतिक अधिकार मी गमावून बसले होते. ही रुखरुख मला आता आयुष्यभर पेलावी लागणार.

जिथं मी, तिथं स्पर्धा हि असणारच. या क्षेत्रात नसेल तर त्या क्षेत्रात. माझा असा आत्मविश्वास होता कि आर. डी. बर्मनला "डिस्कवर" केलं मी. त्यांच्या "छोटे नवाब", "भूत बंगला" आणि "पती-पत्नी" च्या पहिल्या ७८च्या रेकॉर्ड्स विकत आणल्या होत्या मी. त्यांना चरे पडेपर्यंत वाजवलं होतं मी. त्याचं हे सुरुवातीच्या काळातलं संगीत, बाकीच्यांना केवळ ठीक वाटलं होतं. इतरांनी जागं होऊन या संगीताची दाखल घेण्यापूर्वी कोलांट्या उड्या मारल्या होत्या मी. "तिसरी मंझिल" यायला अजून अवकाश होता. मग, ते माझे कसे नसणार ? पंचम अंकलना ठावूक होतं, अगदी खरोखर ठावूक होतं, कि त्यांची सर्वात मोठी 'fan ' होते मी. त्यांनी संगीत दिलेल्या अगदी जुन्या, "फ्लॉप" सिनेमातलं कुठलंतरी गाणं आठवत नसलं, तर ते मला विचारत. "वर्षू! वह अरुणा इरानी जिसमे थी, उसमें वो बिंदू ने किया हुआ मुजरा कौनसा था?" मी पटकन म्हणायचे, "राजा बना मोर छैला", आणि अभिमानाने जरा अधिक फुलून जायचे. जेव्हा आर. डी. ने "बोसानोवा" सारखा उन्मादक लाटिन-ठेका हिंदी संगीतात मिसळला, तेव्हा मीही तरुण होत होते. माझ्या अक्क्ख्या पिढीसाठी आर. डी. चं संगीत म्हणजे एक संपूर्ण तारुण्य, स्वातंत्र्य आणि उत्साह. पण मी हे कधीच बोलून दाखवलं नाही. ही रुखरुख मला आता आयुष्यभर सांभाळावी लागणार आहे.

आईबरोबर माझ्या झालेल्या वादावादीचा बरेचदा पंचम अंकलचा संबंध असायचा. एखाद्या बीईच्या अगदी नॉर्मल वाटावं अशा वागण्यावर, पंचम अंकल आणि मी एकदम का खिदळायचो, किंवा आपसात एक शब्दही न बोलता, वरकरणी कोणतंही कारण नसताना एकाच वेळी का जोरजोरात हसत सुटायचो हे आईला कधीच कळायचं नाही. तिला नेहमी वाटायचं आम्ही तिचीच चेष्टा करायचो. आणि अनेकदा तसंच असायचं. जसा एक उत्तम "कार्टुनिस्ट" एका अतिशय सुंदर चेहऱ्याच हास्यास्पद "कॅरीकेचर" काढू शकतो, तसाच पंचम अंकलनाही ही "सेन्स ऑफ द अब्सर्द" लाभला होता. त्यांच्या सर्व मित्रांशी त्यांचं ( त्यांच्याच शब्द वापरायचा तर ) हे विचित्र "ट्यूनिंग" असायचं. माझं आणि त्यांचही हे "ट्यूनिंग" चांगलं जमायचं. मला वाटलं होतं कि इतकं जमलं ना, बस झालं. मीच तर त्यांची खरी मुलगी. पण रक्ताचे नातेवाईक आपल्याकडून खूप काही हक्काने वसूल करून घेतात. आपणही नेहमीच्या सवयीने, नाईलाजाने "कॉम्प्रोमाईज" करत राहतो. पण ही तडजोड मी पंचम अंकलसाठी केलीच नाही. ही रुखरुख नव्हे, ओझं मला आता आयुष्यभर खेचाव लागेल.

अलीकडे पाश्चात्य संगीताची चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करणारे अनेक लेख छापून आले होते. त्यांनी कधीच या आरोपांचा इन्कार केला नाही. मलाही तो धुड्कावायचा नाही. होय, त्यांची अनेक गाणी हि बेधडकपणे उचलली आहेत. पण म्हणून ती गाणीच काही अख्खा आर. डी. नव्हे. संगीताचा कान असणाऱ्यांचा लाडका आर. डी. हा वेगळाच आहे. माझे पंचम अंकल म्हणजे "ओ मेरे दिल के चैन" ( मेरे जीवन साथी ) आणि "शराबी, मेरा नाम हो गया" ( चंदन का पलना ) आणि "ये शाम मस्तानी" ( कटी पतंग ) आणि "तेरी मेरी यारी बडी पुरानी" ( चरित्रहीन ) आणि "दिलबर दिल से प्यारे" ( कारवां ) आणि "प्यार के मोड पे छोडोगे न बाहें" ( परिंदा ) - ही गाणी देणारे. पहिल्यांदा, आणि शेवटची, जी मी त्यांच्या तोंडावर त्यांच्या संगीताची स्तुती केली ती "भूत बंगला" च्या बर्याच नंतर. तेव्हा "आओ ट्विस्ट करे" हे मला एक अप्रतिम गाणं वाटायचं. त्यावेळी मला ती कळली नाही, अशा खास नजरेने माझ्याकडे बघून ते म्हणाले, "वर्षू! तू अभी बच्ची है." मला ते झोंबल. होते किती मी ? १४ किवा १५. पण, खूप नंतर, जेव्हा मला साक्षात्कार झाला, तेव्हा मी ते कधीही मान्य केलं नाही. ही रुखरुख मला आता आयुष्यभर वागवावी लागणार आहे.

आर. डी. च्या सर्वोत्कृष्ट गाण्यांचा खंड लिहिताना, त्यांनी केलेली असंख्य गाणी त्यात येणारच नाहीत, हे ठाऊक आहे तुम्हाला? माझ्या मनात पटकन काही गाणी येतायत ती वडील एस डी बर्मन यांचा सहायक म्हणून काम करताना तयार झालेली ( purposefully avoided more details on this subject - to avoid any bad breath about this article ) - पंचम अंकलना "हा विषय" नेहमीच नापसंत होता. त्यांना चिडवायचं असलं की माझ्याकडे हा विषय रेडी असे. इथे एस डी बर्मनना कामि लेखण्याचा प्रयत्न नाही. पण जेव्हा या थोर संगीतकाराने अस्सल भारतीय संगीत दिल्याचं म्हटलं जातं तेव्हा आपोआपच आर. डी.नेही ते तसं दिल्याचं सिद्ध होत नाही का ? हे गुपित जाहीर करणं नैतिकदृष्ट्या बरोबर नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आता चिडायला कोण उरलं आहे ? आरोप करणाऱ्यांनो, आधी संगीतावर मनापासून प्रेम करा. मग एखाद्या संगीतकाराची "स्टाईल" स्वतःत इतकी भिनवा की त्याची gaani कोणती हे सांगण्यासाठी तुम्हाला अन्य साक्षीदाराची गरज पडणार नाही.

मी आर. डी. ना पहिल्यांदा भेटले ते पंचम अंकल म्हणून आणि शेवटपर्यंत ते तेच राहिले. मस्कत मधल्या एका कार्यक्रमाच्या वेळचा एक प्रसंग आठवतोय. मी शैलेंद्र सिंहशी बोलत असताना एका माणसाने मध्येच तोंड खुपसून मला माझ्या "डे-डी" विषयी विचारलं. त्याला माझ्या डेडींची, वडिलांची चौकशी करायची होती. त्याची विचारण्याची पद्धत आणि उच्चार ऐकून शैलू आणि मी जोरात हसत सुटलो. पंचम अंकलनी ते ऐकलं. आम्ही त्यांना हा प्रसंग सांगताना, त्यांचा चेहरा अगदी पडला. मला लगेच समजलं की त्यांना माझे वडील म्हटलं म्हणून आम्ही हसतोय, असं वाटून ते दुखावले गेले. त्यांची चूक सुधारणं मला शरमून गेल्यामुळे जमलं नाही. 'भोसले' हे त्यांचं एकमेव कुटुंब होतं हे मला ठाऊक असूनही हि रुखरुख मला आता आयुष्यभर बाळगावी लागणार आहे.

मी अतिशय थंड रक्ताची व्यक्ती आहे याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा मी रडले नाही. त्या ओळखीच्या, नेहमी हास्य विनोदात बुडालेल्या म्युझिक रूममध्ये शिरले तेव्हाही मी रडले नाही. त्यांचं निष्प्राण देह पहिल्यानंतरसुद्धा मी रडले नाही. सगळ्यांचा बांध फुटला त्यावेळी मी कोरडीच होते. त्यांची अंत्ययात्रा निघाली. आई रडत रडत म्हणाली, "ते चाललेत. आता 'मोनिका...ओ माय डार्लिंग' माझ्यासाठी कोण गाणार?" त्यावेळी माझ्या लक्षात आलं की यापुढे त्यांचं आवाज मला पुन्हा कधीही ऐकू येणार नाहीये. कार्यक्रमात नाही. फोनवर नाही. आता वाट बघण्यासाठी त्यांची नवीन गाणी नसणार. त्या वेळेस मी रडायला लागले. माझ्यातला एक भाग तेव्हा मेला. ज्याच्यावर मी प्रेम केलं, ज्याचा राग केला, ज्याच्याबरोबर हसले, ज्याला धुतकारलं, ज्याला आदर्श मानला, ज्याला धुडकावला, ज्याचा आदर केला - आणि हे सगळं एकाच वेळी, अत्यंत तीव्रतेने केलं, - असा तो एकमेव पुरुष होता.

जन्माने ते त्रिपुराचे राजपुत्र होते. कर्माने संगीताचे "झार" . आता त्यांच्या मृत्युनंतर ते आणि त्याचं संगीत किती थोर होतं यावर भरभरून बोललं-लिहिलं जाईल. त्यांना क्रूरपणे बाजूला सारणारे निर्माते , दिग्दर्शक आणि श्रोतेही त्यांचे गुणगान गातील. त्यांना ढासळंवणाऱ्या माझ्यासारखे अनेक सामान्यही आता खूप काही लिहितील. गेली काही वर्षं ते किती एकटे, दुःखी आणि फेकले गेल्यासारखे झाले होते, हे त्यांच्यावर लिहिणारे लिहिणार नाही. आपण त्यांना एकटेपण दिलं हे लिहिणार नाहीत. जे घडलं ते घडून गेलं. आता जाहीरपणे त्याची उजळणी कशाला ? ही नेहमीचीच वाक्यं. मी म्हणते, या लोकांना शिक्षा व्हायला हवी. आर. डी. हे चालते नाणे नाही हे आपण केव्हा कसं ठरवलं ? त्यांची नक्कल करणाऱ्यांच दुसऱ्या दर्जाचं संगीत स्वीकारून आपण या मूळ संगीतकाराला का झिडकारल ? आज मी रडतेय. तुम्हालाही दुःख होतंय चित्रपटसृष्टीची फार मोठी हानी झाली. वर्तमानपत्रात त्यांच्या निधनाची मोठी हेड्लाईन आहे. ते जिवंत होते आणि त्यांना आपली गरज होती. तेव्हा आपण कुठे होतो ? हातात काम नसताना , एकही हिट नसताना ? काय उत्तर आहे ? त्यांच्या मनाला आपण इतके धक्के दिले की त्यांचा मृत्यू ह्रदय-झटक्याने आपण घडवून आणला. ही रुखरुख आपल्या सर्वांनाच आयुष्यभर भोगावी लागणार.

The same archaic seven notes. Centuries have past and they are still relevant. Those very seven notes, one has to weave and build a novel tune. While creating, only the tune flowing in a top quality musician's emotionally packed and heartily delicate manner, brings out a "style" in itself. It surely has a "stamp" of the style. Just looking at her, she points out a finger towards her master/creator and proudly says 'my name is STYLE and I belong only to him'. It was with Madan Mohan. Its with Naushad. Roshan, Salil, Sajjad, Jaidev, all old stalwarts captured her and nurtured her. But since the decade of the 60's other music directors started to seize her, to disrobe her. Are they music directors ? They are vultures. Biting the flesh out of other people's imagination and then selling it in the market at reduced rates. The great duo Shankar Jaikishan's death from the art and life, was not merely a death. It was a murder. Of their crushed hearts. Today on 4th Jan 1994, my step father, R D Burman died in a similar fashion. First strikes were made by _____ _____ ( direct name of a music director was printed, but deleted by kcp, only to prevent any bad feelings reading this "tribute" )

They say that experiences of death wipes all bitterness in the mind. Maybe one day I would forgive _____ ( same music director 's name ) too, but today it is not possible for me. My wound is fresh and bleeding. Its so strange. The very same behavior of keeping certain negative notions in mind for years, made me not speak with Pancham Uncle, for the last 3 years of his life. In the end it was me who made up. But that was only to make his wife and my mother, Asha Bhosle, happy, on the occasion of her 60th birthday. In fact my mother and he, had already patched up their differences, long time back. It was me, who was fighting for an empty fort. I realize that now, after it is too late. That was a private matter between a husband and a wife. I had no right to poke my nose in it. Sometimes the certain scenes from films come into real life , similarly certain problems like (film) "Abhimaan" must have raised in their marriage. But again I had no right to be in between that. My reaction was more of an over-possessive and an over-protective daughter. I don't remember exactly when and for what reason, I broke relations with him. I would now repent for this, and carry it with me for whole of my life.

When I was five, I declared to everybody , "If at all I marry, I would marry Baal Uncle ( Pt Hridaynath Mangeshkar )". Obviously this madness came off my mind lateron. There-afterwards after about 7-8 years , the moment I heard the song "Maar daalega dard jigar" from (the film) "Pati Patni" , I already told myself that if I marry, I would marry this music director, R D Burman, only. If there was an Asha-RD recording, Varsha was always on tow. I forgot everything and heard their music. Later , with age, I gained a bit more maturity. Got to mingle with people of my age. But how can I forget that first madness of that tender age? Mother and Pancham Uncle were fully aware of my craze towards music. Both of them handled me with great care and right balance. Just like the strings entangled in the notes. There were no shrieks, tribulations or affliction. They took care not to wake up the competitive behavior within me, which had died down over a period of time. So much so that I must be the first and the only person to accept their marriage , years later. Their bond must have made in heaven. Tried and tested adjectives would be enough for defining this bond - He was the tune and she was its notes. The meeting between art and mind had no entry for others. Today at the funeral, one lady said "I thought that they were separated. Is Asha taai really so much sorrowful ?" I heard that. But I had already lost the moral right to answer her back. I would now repent for this, and have to bear its weight for whole of my life.

Wherever I am there, competition has to be in some form or the other, in some field or the other. I was quite confident that I was the one to discover R D Burman. I had bought his 78 (rpm) records of films like "Chhote Nawab", "Bhoot Bungla" and "Pati Patni". Played them till the groves worn out. This initial part of his musical career seemed ordinary, for some people. Even before people were awake to this music of his, I was already somersaulting with it. "Teesri Manzil" had not yet released, so how could he not be mine ! Pancham uncle knows, really did he know, that I was his biggest fan. If he did not remember some song from his super flop movie, he used to ask me, "Varshu, wah Aruna Irani jusmen thi, usmen vo Bindu ne kiya hua mujra kaunsa tha?" I used to immediately reply, "Raaja banaa mor chhaila" and beam a bit more with happiness. The time RD mixed a romantic Latin-beat like Bosanova in Hindi music, I was a blossoming into a young girl. For the entire generation of mine, RD's music meant youth, freedom and excitement. But I never let him know these feelings of mine. I would now repent for this, and carry the burden for whole of my life.

The quarrels that I had with mother, most of the time Pancham was related to them. On certain actions of mother, even though they were quite normal for a woman to perform, we used to laugh suddenly, or without speaking with each other and without any dime or reason, laugh boisterously. Mother would never understand why we were doing so. She always thought that we were making fun of her. But often it was so. The way an excellent cartoonist could draw a caricature out of a beautiful person's face, Pancham Uncle was gifted with a similar "sense of the absurd". In his own words, he had "this tuning" with all his friends. This tuning of mine and his was also great. I used to say, I have achieved that , then its enough - I am his real daughter. But blood relatives take a lot from us authoritatively. We too unwillingly compromise , with our old habits. But I did not make this adjustment ever, for Pancham Uncle. Its not a repenting, but this baggage I have to pull along all my life.

Nowadays there are lots of articles on him, accusing him of stealing western tunes. He too did not deny certain accusations. Even I do not want to push it away. Yes, he lifted certain tunes. But those few tunes are not the full R. D. People who have knowledge about music, RD is a different man for them. My Pancham Uncle is "O Mere Dil Ke Chain" (Mere Jeevan Sathi) and "Sharaabi, Mera Naam Ho Gaya" (Chandan Ka Palna), and "Ye Shaam Mastani" (Kati Patang) and "Teri Meri Yari Badi Purani" (Charitraheen) and "Dilbar Dil Se Pyare" (Caarvaan) abd "Pyaar Ke Moad Pe Chhodege Na Bahen" (Parinda) - songs like these that he composed. First and last praise that I uttered in front of him, was quite some time after "Bhoot Bungla". That time I used to consider "Aao Twist Karen" as an excellent composition and used to like a lot. I did not understand his looks in my eyes that time, but he said, "Varshu! you are a kid now". I felt discomposed. How much was I ? 14 or 15. But much later, when it dawned upon me, I never accepted my mistake of praising that song. I would now repent for this, and carry it with me for whole of my life.

When one is writing a book on the best songs of R.D, did you know that there would be so many songs that would not appear in that book? I remember quickly some songs that he made as an assistant to his father, S D Burman ( purposefully avoided more details on this subject by kcp - only to prevent any bad feelings reading this "tribute" ). Pancham Uncle always hated to bring out this subject. Whenever I wanted to irritate him, this subject was handy. Here I want to categorically mention that I do not want to put down S D Burman. But when people say that this great music director gave pure Indian music, then would not RD be automatically involved in this pure creation ? I know that to reveal this secret publicly is not morally right, but who is there to be irritated or angry, "now" ? O Critics...who know only to blame - first learn to love "music", from the bottom of your hearts. Then gather the style of a certain music director and let it percolate deep within, so that you can tell that so and so song is made by that music director, without need of any kind of proofs.

I met RD the first time, knowing him as Pancham Uncle and he remained the same for me right till the end. I remember one incident which happened during a show at Muscat. I was having a chat with Shailendra Singh and one man poked his nose in between the conversation and started asking me about my "daddy". He wanted to ask about my my father, my daddy, how he was. The manner in which he asked and his pronunciations, Shailu and me started laughing aloud. Pancham Uncle heard that. We told him what happened. His face suddenly fell and became sad. Immediately I realized that he was hurt when we laughed at somebody calling RD her daddy. I was feeling shy and so I did not clear that misunderstanding. "Bhosle" was his only family, and already knowing that , I would now repent for this, and carry the burden for whole of my life.

I am proud that I am a cold blooded person. I did not cry when I got the news of his death. I did not cry even when I entered that familiar music room, which was always drowned with laughter. I did not cry even after seeing his lifeless body. Everybody else's floodgates opened, but I was dry. The funeral procession started. While crying my mother said "He is going. Now who will sing "Monica...O my darling for me ?" That time I realized that I would not be able to listen to his voice ever after this moment. Not in shows or events. Not on phone. Now there would be no more waiting for his new song releases. And that time I started crying. One part of me died that very moment. The person I loved, with him I got angry, with whom I laughed, whom I chided with at times, whom I considered as my idol, whom I brushed off at times, whom I respected - and all these I did at the same time, with utmost passion - he was the only man for whom I did all this.

He was a prince of Tripura by birth, but a Czar of music by deeds. Now, after his death, colums would be spoken-written as to how great he was. Those who pushed him away with cruelty, those producers, directors and listeners too will sing praises of him. Ordinary people like me who broke him down, would also write a lot about him. But nobody will write how he was alone, sad and ostracized in his last few years of his life. They gave him the loneliness, nobody would want to write about that. "Anyways bygones are bygones. Now why publicly repeat the same things?" these would be standard sentences. I say that such people must be punished. When and who decided that R. D. is no more a genuine coin ? Why did we brush away this original composer and accepted his second class clones' music ? Today I am crying. You are also sad that the film industry has been deprived of a great talent. There is a big headline in the newspaper about his death. He was alive and he needed us, where were we then ? No work at hand, no hit for a long time ? What is the answer to this ? We have given so many shocks to his mind and that we are the ones who have brought him this heart attack. We all will have to repent this for the whole of our lives !

Regards

KCP
User is offlineProfile CardPM
Go to the top of the page
+Quote Post

Reply to this topicStart new topic
1 User(s) are reading this topic (1 Guests and 0 Anonymous Users)
0 Members:


 - Lo-Fi Version | Disclaimer | HF Guidelines | Be An Angel Time is now: 22nd June 2018 - 07:25 AM