मराठी गझल : एक अखंड मैफल!, मराठी गझल लिहिण्या, वाचण्य |
मराठी गझल : एक अखंड मैफल!, मराठी गझल लिहिण्या, वाचण्य |
yogihit |
Sep 29 2010, 05:21 PM
Post
#1
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
Regards, Yogi An open source Person |
yogihit |
Sep 29 2010, 05:32 PM
Post
#2
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
I am requesting all of you please share suresh bhat Ghazals.
Regards, Yogi An open source Person |
yogihit |
Oct 6 2010, 06:28 PM
Post
#3
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
आकाश उजळले होते
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या (पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?) मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते (एल्गार) सुरेश भटांची गझल Regards, Yogi An open source Person |
yogihit |
Oct 6 2010, 06:29 PM
Post
#4
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
ओठ
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ? माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ? आज का तुला माझे एव्हढे रडू आले ? तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ? हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ? बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा' तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ? कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ? वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ? चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ? (एल्गार) सुरेश भटांची गझल Regards, Yogi An open source Person |
dadas |
Oct 25 2010, 10:34 AM
Post
#5
|
Member Group: Members Posts: 139 Joined: 26-September 09 Member No.: 141182 |
|
yogihit |
Oct 26 2010, 02:19 PM
Post
#6
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
Regards, Yogi An open source Person |
yogihit |
Oct 26 2010, 02:21 PM
Post
#7
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
बोलणी
आसवांच्या सरी बोलती मी न बोले, तरी बोलती ऐक डोळेच माझे अता ओठ काहीतरी बोलती संत मोकाट बेवारशी सांड संतापरी बोलती बांधती चोर जेव्हा यशे "ही कृपा ईश्वरी"- बोलती शांत काटे बिचारे परी ही फुले बोचरी बोलती तेच सापापरी चावती जे असे भरजरी बोलती रोग टाळ्या पिटू लागले "छान धन्वंतरी बोलती !" झुंजणारे खुले बोलती बोलणारे घरी बोलती (एल्गार) सुरेश भटांची गझल Regards, Yogi An open source Person |
yogihit |
Dec 15 2010, 12:58 PM
Post
#8
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय
by बेफिकीर गझल कार्यशाळा व गझल परिचय यात फरक आहे. कार्यशाळेमध्ये तंत्राचा सराव करून घेतला जातो व काही वेळा लेखनातील सफाईचा! गझल परिचय यात गझलेबाबत एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे व त्याबरोबरच संपूर्ण गझल तंत्र, मात्रा कशा मोजाव्यात, सुटी कोणत्या घ्याव्यात, विविध वृत्ते कोणती, ती कशी योजावीत हे सोदाहरण लिहीलेले आहे. भटसाहेबांनी मराठीला दिलेल्या देणगीमध्ये, म्हणजे 'गझलेची बाराखडी'मध्ये अर्थातच मात्रा कशा मोजाव्यात, विविध वृत्ते कोणती हे दिलेले नाही कारण तो त्यांचा हेतूच नव्हता. मात्र मला गेल्या काही काळात असे लोक भेटले की जे गझलतंत्र तर समजलेले आहेत पण त्यांना वृत्त व मात्रा याबाबत अनेक शंका आहेत. अनेक पुस्तकांमधील माहिती, अनेक जाणकारांची मते व मला वाटलेले काही मुद्दे असे एकत्र घोळवून हा लेख लिहीलेला आहे. खरे तर हा लेख माझ्या गझलसंग्रहात, 'बेफिकीरी'मध्येच छापणार होतो. पण काही कारणाने ते रद्द झाले. मी स्वतः गझल लिहायला 'सुरेश भट डॉट इन' या संकेतस्थळावर व तेथील जाणकारांकडून शिकलो. हा लेख लिहिण्याचा अधिकार माझ्याकडे आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. मी बेधडक लिहीत आहे. मात्र इतके नक्की की हा लेख सर्व तांत्रिक शकांचे निरसन करू शकेल व गझलेबाबत एक दृष्टिकोनही देऊ शकेल. माझ्या या लहानश्या प्रवासात अनेक मंडळींची मला मदत झाली. त्यांचे आभार! धन्यवाद! -'बेफिकीर'! Attached File(s) Gazal_Parichay_by_Befikir.pdf ( 322.57 k ) Number of hits: 4 by members Regards, Yogi An open source Person |
Lo-Fi Version | Disclaimer | HF Guidelines | | Time is now: 25th April 2024 - 06:46 AM |